एका महत्वपूर्ण निर्णयात सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे कि गर्भपात करण्यासाठी महिलेला यापुढे तिच्या पतीची परवानगी घेण्याची गरज भासणार नाही एका प्रकरणात सुनावणी देताना न्यायालयाने स्पष्ट केले की कोणत्याही सज्ञान महिलेला तिच्या बाळाला जन्म देण्याचा किंवा गर्भपात करण्याचा निर्णय घेण्याचा अधिकार आहे.'पती-पत्नीतले तणावपूर्ण संबंध पाहता गर्भपात करण्याचा पत्नीचा निर्णय पूर्णपणे कायद्याच्या अखत्यारितला आहे,' असे न्यायालयाने म्हटले आहे.घटस्फोट घेतलेल्या एका महिलेच्या पतीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. पत्नी आपल्या परवानगीशिवाय गर्भपात करत असल्याने तो गर्भपात अवैध असल्याचा आरोप पतीने या याचिकेत केला होता.त्या याचिकेच्या निर्णयामध्ये न्यायालयाने हे स्पष्ट केले
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews